Rohit Sharma 
क्रीडा

Ind vs Eng: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहितने दिले खेळण्याचे संकेत

रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे.

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पुढील महिन्यात एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा खेळ निश्चित नाही. सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयने ट्विट करून रोहितला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. रोहित शर्माने पाचव्या कसोटी सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांना संकेत दिले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने इंस्टाग्रामवर त्याच्या हॉटेल रूममधून एक सेल्फी शेअर केला आहे, जिथे तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्माची ही पहिली पोस्ट आहे. रोहित खेळला नाही तर पाचव्या कसोटीसाठी कर्णधार कोण होणार?.

इंग्लंड विरुद्व पाचव्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतने भारताचे नेतृत्व केले होते. निवडकर्त्यांच्या पूर्ण आत्मविश्वासामुळे ऋषभ पंतला ही जबाबदारी मिळू शकते.

गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा एक भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला.

रोहितने त्या चार कसोटी सामन्यांमध्ये 52.27 च्या सरासरीने 368 धावा केल्या, त्यात ओव्हलवरील शतकाचा समावेश आहे. आता त्या मालिकेतील पाचवा सामना 1 ते 5 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. जर भारताने एजबॅस्टन कसोटी किमान ड्रॉ केली तर ते मालिकेवर कब्जा करतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Encroachment Removal: सरकारी जमिनींवरील अनधिकृत ताबा तातडीने हटवा; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, "गरीब लोकांच्या जमिनीवर.."

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Arbaaz Khan Blessed with a Baby Girl: अरबाज खान पुन्हा बाबा झाला, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Ladki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी ‘लाडक्या बहिणीं’ची पायपीट; सर्व्हरचा खोडा ठरतोय मोठा अडसर फाॅर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण

Marathi Movie : अरेंज मॅरेजची मॉडर्न गोष्ट, प्रेमाची गोष्ट सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

SCROLL FOR NEXT