Rohit Sharma Seam Movement In India  esakal
क्रीडा

Rohit Sharma : हे असं भारतात पहिल्यांदाच होतयं... सामन्यानंतर रोहितही झाला आश्चर्यचकीत

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Seam Movement In India : भारताने न्यूझीलंडचा दुसऱ्या वनडेत 8 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 15 धावा अशी केली होती.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामना झाल्यावर भारतीय गोलंदाजांची तोंडभरून स्तुती केली. तो म्हणाला की, 'गेल्या पाच सामन्यात आमच्या गोलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. ज्या ज्या वेळी संघाला गरज होती त्या त्या वेळी त्यांनी आपली कामगिरी उंचावत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.'

आजच्या सामन्यात रायपूरच्या फ्रेश विकेटवर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट सीम गोलंदाजी केली. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, 'सहसा तुम्ही भारतात अशा प्रकारची सीम गोलंदाजी पाहत नाही. परदेशी खेळपट्ट्यांवर अशा प्रकारची सीम गोलंदाजी आपण पोहतो. आमच्या गोलंदाजांकडे उत्तम गुणवत्त आहे. ते खूप कष्ट करत आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवर भरपूर काम करत आहेत. त्याचे फळ त्यांना मिळत आहे.'

रोहित पुढे म्हणाला की, 'संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावल आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे मोठा स्पेल टाकण्यासाठी आतूर असतात मात्र मी त्यांना कायम आपल्याला पुढे कसोटी मालिका खेळायची आहे याची आठवण करून देत असतो. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

Latest Marathi News Update : सोलापुरात शिंदेसेना,काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद

SCROLL FOR NEXT