rohit sharma t20 world cup 2022
rohit sharma t20 world cup 2022 
क्रीडा

T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे, आता फक्त...

Kiran Mahanavar

Rohit Sharma T20 World Cup 2022 Team India : यंदा टी20 विश्वचषकाचा थरार ऑस्ट्रेलियामध्ये आक्टोबर- नोव्हेबर महिन्यात रंगणार आहे. विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत, पण टीम इंडियाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. परंतु भारतीय संघ अद्याप आपली प्लेइंग इलेव्हन ठरवू शकलेला नाही.

रोहित शर्माला विश्वचषक 2022 पूर्वी 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तयारी मजबूत करण्याची संधी आहे, ज्यामध्ये तो एक गमावला आहे. मोहाली टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. येथे संघाचे क्षेत्ररक्षण आणि डेथ बॉलिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्याचवेळी पंत की डीके यांचाही प्रश्न अद्याप सुटला नाही.

टीम इंडियासाठी समस्या आहे की जडेजाच्या दुखापतीनंतर टॉप 6 मध्ये एकही डावखुरा फलंदाज नाही. संघ व्यवस्थापनाकडे यष्टिरक्षक म्हणून पंत किंवा डीके यांच्यापैकी एकाची जागा रिक्त आहे. कार्तिक फिनिशरची भूमिका चोख बजावत असताना, मधल्या फळीत डाव्या हाताच्या फलंदाजाची पोकळी भरून काढणारा पंत हा एकमेव फलंदाज आहे. अशा परिस्थितीत आता कोणाला संधी द्यायची हे पाहावे लागेल.

भारताची आजून एक समस्या म्हणजे डेथ ओव्हर्स आहे. आशिया चषक 2022 मधून असे दिसून आले आहे की भारतीय गोलंदाज सुरुवातीला प्रभावी दिसत आहे. पण शेवटच्या काही षटकात विरोधी फलंदाजांना ते रोखू शकले नाहीत. त्यापैकी सर्वात मोठी समस्या भुवनेश्वर कुमारची डेथ बॉलिंग आहे. रोहितने प्रत्येक वेळी भुवीवर 19 वे षटक टाकण्याचा विश्वास ठेवला. परंतु त्याने प्रत्येक वेळेस निराशाजनक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहच्या आगमनाने डेथ ओव्हर्स मध्ये नक्कीच सुधारणा होईल, पण बुमराहला दुसऱ्या टोकाचीही मदत लागेल.

टीम इंडियासाठी शेवटची आणि महत्त्वाची समस्या म्हणजे खेळाडूंची दुखापत आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला, तर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे पहिल्या टी-20 मध्ये संघाचा भाग नव्हता. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मोहम्मद शमी या मालिकेतून बाहेर पडला आहे. विश्वचषकापूर्वी किंवा स्पर्धेदरम्यान एक-दोन भारतीय गोलंदाज जखमी झाले, तर टीम इंडियासाठी अनेक अडचणी निर्माण होतील. दीपक चहर आणि मोहम्मद शमी बौतार यांची स्टँडबाय वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. शमी 2021 च्या विश्वचषकानंतर भारतासाठी टी-20 खेळला नाही, तर चहर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT