esakal
क्रीडा

Video : रोहित शर्मा जिममध्ये गाळतोय घाम, मुंबई इंडियन्स म्हणते...

ब्रेकवर असणारा रोहित शर्मा जिममध्ये गाळतोय घाम

धनश्री ओतारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाने सोमवारी जोरदार तयारी सुरु केली आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरु होणार आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

यंदाच्या आयपीएल सीझन १५ मध्ये फ्लॉप ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने रोहितचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित मोठी मेहनत घेताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेदरम्यान त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या ब्रेकवर आहे.

मात्र, सध्या तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने खास कॅप्शनदेखील दिली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. पहिला सामना दिल्लीत होणार आहे. या आगामी मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती दिली केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RaJ-Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधुंचा 'मराठी'चा डाव, कॉंग्रेस नेते संभ्रमात; नेमकं काय घडलं?

Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वडिलांचा 'तो' सल्ला ऐकला नाही अन् पुढे इतिहास घडला...

Pune News : तो धावत गेला आणि खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा जीव वाचवला.. कात्रजमध्ये युवकाचे धाडसी कृती

Akash Deep: जो रूटचा त्रिफळा उडवणारा तो चेंडू No Ball? MCC ने दिला निर्णय; पुढच्या सामन्यात आकाश दीप खेळू शकेल का?

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

SCROLL FOR NEXT