S Sreesanth Spot Fixing esakal
क्रीडा

S Sreesanth : श्रीसंतविरूद्ध होते पुरावे मात्र विशेष कायदा नसल्यानं... माजी पोलीस आयुक्त नीरज यांनी केला मोठा दावा

अनिरुद्ध संकपाळ

S Sreesanth Spot Fixing : दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले की भारतीय क्रीडा जगतात भ्रष्टाचारविरूद्धचा कायदा करण्यात फारसं गंभीर कोणी नाही. यामुळेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सारखा व्यक्ती आयपीएल 2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पुरावे असूनही सुटला.

आयपीएस अधिकारी नीरज दिल्ली पोलीसचे प्रभारी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने श्रीसंत आणि राजस्थान रॉयल्सच्या इतर अनेक क्रिकेटपटूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली होती. यात अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांचा समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये या सर्वांची या प्रकरणी निर्दोश मुक्तता केली होती. मात्र तरी देखील बीसीसीआयने त्यांच्याविरूद्धची आजीवन बंदी उठवली नव्हती. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर त्यांची शिक्षा सात वर्षे करण्यात आली. ही शिक्षा 2020 मध्ये संपुष्टात आली.

नीरज यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'असं वाटतं की या प्रकरणी पुढं काहीच झालं नाही. दुर्दैवाने क्रिकेटमध्ये तसेच खेळातील भ्रष्टाचाराविरूद्ध भारतात कोणताही कायदा नाही. झिम्बाब्वेसारख्या देशातही यासाठी विशेष कायदा आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातही कायका आहे. युरोपात कायदा आहे. कारण भ्रष्टाचार फक्त क्रिकेटमध्ये नाही तर फुटबॉल, टेनिस, गोल्फमध्ये देखील आहे.'

नीरज कुमार हे 2000 मध्ये हॅन्सी क्रोनियेविरूद्धच्या मॅच फिक्सिंग प्रकणारच्या तपासाशी देखील जोडले गेले होते. ते सीबीआयच्या टीमचे सदस्य होते. त्यांनी सांगितले की खेळातील भ्रष्टाचाराविरूद्ध कोर्टात केस उभी करण्यात कायद्याचा अभाव ही मोठी अडचण आहे.

ते म्हणाले की, 'सांगायचं झालं तर आम्ही अनेक गोष्टी करतो. त्या न्यायालयाच्या कसोटीवर खऱ्या उतरत नाहीत. जर आम्ही म्हणतोय की मॅच फिक्सिंगदरम्यान लोकांना फसवण्यात आलं त्यावेळी कोर्ट म्हणतं की मला फसवला गेलेला एक व्यक्ती दाखवा. त्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणा.

नीरज म्हणाले की, 'आता मला सांगा की न्यायालयात येऊन कोण सांगणार की मी निष्पक्ष खेळ आणि प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार खेळेल या आशेने क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलो होते. प्रकरणात पीडितच कोणी नसेल तर गुन्हा सिद्ध करणं अवघड होतं.'

(Cricket Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT