क्रीडा

SA vs IND 2nd Test : शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितने संघात केले मोठे बदल! अश्विन-शार्दुल बाहेर, या खेळाडूंना मिळाली संधी

Kiran Mahanavar

SA vs IND 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी बुधवारपासून केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूरलाही वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि मुकेश कुमार यांना भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. एनगिडी आणि महाराज यजमान संघात परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी डीन एल्गरची ही शेवटची कसोटी आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multi Lane Free Flow: टोल प्लाझावरील गर्दी संपणार! 120 च्या वेगात गाड्या धावणार, टॅक्स आपोआप कटणार, सरकार 'ही' नवी प्रणाली लागू करणार

Cidco Action: मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘सिडको’ची धडक कारवाई

BCCI चीही भीती आता उरली नाही? LSG च्या सदस्याने CSK विरूद्धच्या सामन्यावेळी वापरला फोन? Photo व्हायरल

Shani Jayanti 2026: यंदा 15 की 16 मे, कधी आहे 'शनि अमावस्या'? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Latest Marathi News Live Update : हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहितेचा छळ, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT