Sachin Tendulkar Makar Sankranti VIDEO esakal
क्रीडा

Sachin Tendulkar VIDEO : मकर संक्रांतीला सचिननं दिले घरच्यांना 'गोड' सरप्राईज; आदर्श घेण्यासारखी कृती!

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Makar Sankranti VIDEO : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारतीय लोकांवर इतकं गारूड आहे की क्रिकेटची बॅट हातात घेतली की सर्वांना सचिन तेंडुलकर सारखंच खेळायचं असतं. जवळपास अख्खी पिढी सचिनला पाहूनच क्रिकेट शिकली असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. मात्र क्रिकेटच्या पलिकचे सचिनचे व्यक्तीमत्व देखील तितकेच प्रभावी आहे. यशाच्या शिखरावर देखील विनम्र आणि साध आयुष्य जगणे हे शिकावं ते सचिन तेंडुलकरकडूनच.

सचिन तेंडुलकरने आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. मात्र त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओत सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना दिसतोय. याचबरोबर सचिन तेंडुलकरने एक महत्वाची गोष्ट देखील केली. त्याने आपल्या कुटुंबियांसाठी पहिल्यांदाच तिळगूळ बनवले. हे सचिनकडून कुटुंबियांसाठी संक्रांतीचे सरप्राईज होते.

सचिनने आपल्या या व्हिडिओत म्हणतो की, 'मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा! मी आज तिळगूळ करणार आहे. मात्र हे सरप्राईज आहे. घरच्यांना याबाबत काही माहिती नाही.' सचिनने यानंतर व्हिडिओत तिळगूळ करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर तो म्हणाला की, 'तिळगूळ तर करून झालेत मात्र हे असं आहे की परीक्षेचे पेपर लिहिले आहेत मात्र रिझल्टची वाट पोहतोय.... तिळगूळ घ्या गोड बोला.'

सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सचिन तेंडुलकर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कोणते प्रमोशनल व्हिडिओ शेअर करत नाही तर साधे साधे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने आपल्या व्हेजिटेबल गार्डनची चाहत्यांना सैर घडवली.

सचिन तेंडुलकरने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चुलीवर जेवण करणाऱ्या महिलांचा देखील व्हिडिओ शेअर केला होता. तसेच प्रवासात चहाच्या टपरीवरील चहा आणि होम मेड बिस्किट्सचा देखील आस्वाद घेतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT