Shane Warne Death Anniversary  esakal
क्रीडा

Shane Warne Death Anniversary : आय मिस यू मित्रा... सचिन वॉर्नीच्या पहिल्या स्मृतीदिनी झाला भावूक

अनिरुद्ध संकपाळ

Shane Warne Death Anniversary : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा आज पहिला स्मृतीदिन आहे. आजच्याच दिवशी शेन वॉर्नने तमाम क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवत या जगाचा निरोप घेतला होता. 4 मार्चला शेन वॉर्न थायलंडमधील एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत सापडला होता. त्याचा मृत्यू हा ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. तो थायलंडमध्ये मित्रांसोबत सुट्टी घालवत होता.

शेन वॉर्नच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगत हादरून गेले होते. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील भावूक झाला होता. आज या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. यावेळी देखील जगभरातील आजी माजी क्रिकेटपटू आणि वॉर्नच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती.

सचिन तेंडुलकरने देखील आज भावनिक ट्विट केले. सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'मी तुला एक ग्रेट क्रिकेटर म्हणून मिस करत नाहीये तर एक ग्रेट मित्र म्हणून देखील मिस करत आहे. मला खात्री आहे की तू तुझ्या विनोदवृत्ती आणि व्यक्तीमत्वाने स्वर्ग देखील अजून सुंदर केला असशील वॉर्नी!'

सचिनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टने देखील शेन वॉर्नच्या पहिला स्मृतीदिनी ट्विट केले. तो म्हणाला, 'ज्या व्यक्तीने मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आणि एक असा स्वप्नवत व्यक्ती जो तुमच्या सतत सोबत राहिला... RIP'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT