sachin tendulkar surprises fan wearing miss you tendulkar 10 mi jersey on road watch video  
क्रीडा

Sachin Surprises Fan : 'तेंडुलकर आय मीस यू' जर्सी घातलेल्या चाहत्याला सचिनचं भररस्त्यात सरप्राइज! Video एकदा पाहाच

sachin tendulkar surprises fan Video : रस्त्यावरून जात असलेल्या तेंडूलकर फॅनला सचिन तेंडुलकरने मोठं सरप्राइज दिलं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

sachin tendulkar surprises fan Video : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन्स देशासोबतच जगभरात आहेत. कित्येक जण सचिनचा मैदानावरील अप्रतिम फलंदाजी पाहत लहानाचे मोठे झाले आहेत. दरम्यान सचिन तेंडूलकरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सचिन त्याच्या एका चाहत्याला सरप्राइज देताना दिसत आहे.

सचिन तेंडुलकरला कारमधून प्रवास करताना रस्त्यावर समोर एक चाहता बाइकवर जाताना दिसला. जो १० नंबरची तेंडुलकर आय मीस यू अशी मुंबई इंडियन्स संघाची जर्शी घालून बाईकवरून जात होता. त्या चाहत्याला सचिन तेंडुलकर अचानक थांबवतो आणि विमानतळाकडे जाण्याचा रस्ता विचारतो. हरीष कुमार असे नाव असलेल्या या फॅनला सचिन तेंडुलकरच्या रुपात जीवनभर विसरता येणार नाही असं सरप्राइज मिळालं.

सचिनने स्वतःच्या सोशल मीडियावर या फॅनसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कारमधून प्रवास करताना सचिनने रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या चाहत्याला विमानतळाकडे जाण्याचा रस्ता विचारला. या चाहत्याने आयकॉनिक १० नंबरची 'तेंडुलकर आय मिस यू' लिहिलेली जर्सी घातली होती. रस्त्यात अचानक सचिन तेंडुलकर भेटल्याने या चाहत्याला आनंदाचा धक्काच बसल्याचे पाहायला मिळाले.

या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर त्या फॅनचं बाईक चालताना हेल्मेट घातल्याबद्दल कौतुक देखील करताना पाहायलं मिळालं. तसचे हरीष यांनी नंतर सचिनसोबत सेल्फी घेत डायरीवर सही देखील घेतली. या व्हिडीओमध्ये आज स्वतः देवाचं दर्शन झालं अशी भावनिक प्रतिक्रिया देखील हरीष देताना दिसतात. दरम्यान या दोघांच्या भेटीच्या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT