IND vs PAK Football Controversy  esakal
क्रीडा

IND vs PAK Football Controversy : भारत - पाक फुटबॉल सामन्यात राडेबाजी झालीच! भारताच्या प्रशिक्षकाला थेट रेड कार्ड

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Football Controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतोय... तोही फुटबॉलचा सामना आणि त्या सामन्यात राडेबाजी होणार नाही असं कसं होईल? SAFF Championship स्पर्धेचा भारताचा पहिला सामनाच पाकिस्तानसोबत होत आहे. पहिल्या हाफमध्ये भारताने पाकिस्तानवर दोन गोल केल्या. त्यानंतर पहिला हाफ संपता संपता भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची पाकिस्तानच्या खेळाडूशी बाचाबाची झाली. यानंतर रेफ्रींनी भारतीय संघाच्या कोचलाच रेड कार्ड दाखवले.

त्यांच झालं असं की सामन्याच्या 10 व्या मिनिटाला पाकिस्तानच्या गोलकिपरने गचाळपणाचं दर्शन घडवले. याचा फायदा उचलत सुनिल छेत्रीने भारताचा पहिला गोल केला. त्यानंतर 16 व्या मिनिटाला पेनाल्टीवर सुनिल छेत्रीने पेनाल्टीवर अजून एक गोल करत पाकिस्तानवर 16 व्या मिनिटालाच 2 - 0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिला हाफ संपेपर्यंत बॉलवर आपलाच ताबा ठेवत ही आघाडी कायम ठेवली.

मात्र 45 व्या मिनिटाला भारतीय कोच आणि पाकिस्तानी खेळाडू यांच्यात वादावादी झाली. पाकिस्तानचा खेळाडू लाईनच्या बाहेर आलेला बॉल थ्रो करत होता. मात्र कोच इगोर स्टिमॅकने हाताने हा गोल खाली पाडला अन् त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू कोचच्या अंगावर धावून गेले. पंच आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वातावरण निवळले मात्र रेफ्रींनी यासाठी भारतीय प्रशिक्षकांना रेड कार्ड दाखवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT