IPL Auction 2023 Sam Curran Becomes Most Expensive 
क्रीडा

IPL Auction 2023: ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड मोडत Sam Curran ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

Kiran Mahanavar

IPL Auction 2023 Sam Curran Becomes Most Expensive : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या शेवटच्या मोसमाला मुकावे लागले होते, मात्र या हंगामा तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

सॅम करनसाठी राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. राजस्थान 11 कोटीपर्यंत पोहचल्यानंतर सीएसकेने लिलावात उडी घेतली. मात्र लिलाव रंगात आला असताना पंजाब किंग्जने लिलावात उडी घेत सॅम करनला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू केले. मुंबईनेही बोली लावत सॅमचा भाव वाढवला. अखेर पंजाबने 18.50 कोटीला सॅम करनला आपल्या गोटात खेचले.

आयपीएलमध्ये 32 सामने खेळणाऱ्या सॅम करनने 23 डावांमध्ये 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये करनच्या नावावर दोन अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. लीगमधील पहिल्या सत्रात पंजाब किंग्जकडून खेळताना करनने हॅट्ट्रिक घेतली होती. 20 वर्षे आणि 302 दिवसांच्या वयात हॅट्ट्रिक घेणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Aurangabad Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले! ९ वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण, थरारक पाठलाग, रिक्षा नाल्यात फसली अन् काय घडलं..

Latest Marathi Update : 'नीट' आणि पेपरफुटीवर संसदेत सविस्तर चर्चा हवी; विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत : शिवराज सिंह चौहान

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT