Sania Mirza Father Imran Mirza Reacts After Shoaib Malik Marries Pakistani Actor Sana Javed marathi news sakal
क्रीडा

Sania-Shoaib Divorce : 'तलाक नाहीच पण...' शोएबच्या तिसऱ्या लग्नाआधीच सानिया झालीय वेगळी, वडिलांनी केलं स्पष्ट

Sania Mirza and Shoaib Malik Divorce News : भारतीय टेनिस स्टारच्या वडिलांच्या वक्तव्यावरून संपूर्ण प्रकरण झाले स्पष्ट

Kiran Mahanavar

Sania Mirza and Shoaib Malik Divorce : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. याआधी त्याने भारताची आयशा सिद्दीकी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. 2010 मध्ये सानियासोबत लग्न करण्यासाठी शोएबला आयशाला घटस्फोट द्यावा लागला होता.

गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. आता शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सानियाने खुला पद्धतीने शोएबला घटस्फोट दिला. मुस्लिम महिलांच्या अधिकारांनुसार खुला म्हणजे मुस्लिम महिला तिच्या पतीला स्वतःच घटस्फोट देते.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब आणि सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सानियासोबत राहतो. शोएबने आपल्या नव्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

शोएब मलिक आणि सानिया यांचा विवाह 12 एप्रिल 2010 रोजी पारंपारिक पद्धतीने झाला होता. हे लग्न हैदराबादमध्ये पार पडले. लग्नाच्या 8 वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला. शोएब क्रिकेटमध्ये सक्रिय आहे, तर सानियाने गेल्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली.

कोण आहे सना जावेद?

शोएब मलिकची पत्नी सना जावेदची गणना पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. सना जावेदने 2012 मध्ये शहर-ए-जात या मालिकेद्वारे पडद्यावर पदार्पण केले होते. नंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. 'खानी' या टेलिव्हिजन मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला ओळख मिळाली. रुसवाई आणि डंक या सामाजिक नाटकांसाठी सना जावेदचे कौतुक झाले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT