Australian Open: Sania Mirza Rajeev Ram reached into mix doubles quarter finals esakal
क्रीडा

Australian Open: सानिया-राजीव राम जोडी पोहचली उपांत्यपूर्व फेरीत

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने (Sania Mirza) मिश्र दुहेरीत (Mix Double) उपांत्य पूर्व फेरीपर्यंत धडक मारली आहे. सानिया मिर्झा आणि भारतीय वंशाचा अमेरिकन पार्टनर राजीव राम (Sania Mirza - Rajeev Ram) यांनी मॅथवे मिडलकूपा आणि एलेन पेरेझ यांचा आज ( दि. २३ ) कोर्ट ३ वर पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली. (Australian Open Sania Mirza Rajeev Ram reached into mix doubles quarter finals)

सानिया मिर्झा आणि राजीव राम यांनी १ तास २७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात डच - ऑस्ट्रेलियन (Dutch-Australia pair) जोडीचा ७-६ (४), ६-४ असा पराभव केला. डच - ऑस्ट्रेलियन जोडीने सानिया - राम जोडीविरुद्ध आक्रमक आणि वेगवान सुरूवात केली. पण, इंडो अमेरिकन (Indo - American Pair) जोडीनं सामन्यावर पकड मिळवत टाय ब्रेकरमध्ये गेलेला पहिला सेट ६-७ (४) असा जिंकला.

त्यानंतर सानिया मिर्झा आणि राजीव राम यांनी दुसऱ्या सेटमध्ये डच - ऑस्ट्रेलियन जोडीला कोणतीही संधी न देता सेट ६-४ असा जिंकत सामन्यावर विजयी मोहर उमटवली. सानिया मिर्झा आणि राजीव राम हे दोघेही ग्रँडस्लॅम (Grands Slam) विजेते खेळाडू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT