Sanjay Manjrekar statement about Virat Kohli leaving Test Captaincy esakal
क्रीडा

...म्हणून विराटने कर्णधारपद सोडले; मांजरेकरांनी मांडले मत

टांगती तलवार डोक्यावर असली की विराट असा निर्णय घेतो

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वपदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर चोहोबाजूंनी यावर प्रतिक्रिया उमटल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने कौतुकास्पद कामगिरी केली, अशा शब्दांत काहींनी त्याचे कौतुक केले, तर काहींनी दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर तो नेतृत्व सोडेल हे अपेक्षित होते, असे म्हटले. याप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, विराट कोहलीच्या डोक्यावर नेतृत्व जाण्याची टांगती तलवार असते तेव्हा तो नेतृत्व सोडून देतो. याआधी त्याने टी-२०, वन डे क्रिकेट संघ, आयपीएल संघाच्या नेतृत्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. Sanjay Manjrekar statement about Virat Kohli leaving Test Captaincy)

प्रशिक्षक राहुल द्रविड व रवी शास्त्री यांच्यामध्ये फरक आहे. फलंदाजीतही विराटकडून धावा होत नाही आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आश्‍चर्य वाटले नाही : सुनील गावसकर

विराट कोहलीच्या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करताना भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर म्हणाले, विराटच्या निर्णयाचे मला आश्‍चर्य वाटले नाही. मालिकेनंतर बक्षीस वितरण सोहळ्यात तो कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोडेल असे वाटले होते. पण दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवाचा राग त्याच्या मनामध्ये असावा. यामुळे निर्णयासाठी विलंब केला, असे पुढे ते म्हणाले.

बीसीसीआयसह सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

विराट कोहलीने कसोटीचे नेतृत्व सोडल्यानंतर बीसीसीआयसह टीम इंडियाच्या आजी-माजी सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने तिन्ही प्रकारांत प्रगती केली आहे. त्याने घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. त्याचा आम्ही आदर करतो. पण यापुढेही तो संघाचा सदस्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT