Sanju Samson Deepak Hooda Broke Rohit Sharma KL Rahul Highest partnership for any wicket for India in T20I
Sanju Samson Deepak Hooda Broke Rohit Sharma KL Rahul Highest partnership for any wicket for India in T20I  esakal
क्रीडा

IND vs IRE : सॅमसन - हुड्डाने मोडले रोहित - राहुलचे रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

डब्लिंग : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत 7 बाद 227 धावा ठोकल्या. भारताने आज आपल्या संघात तीन बदल केले होते. त्यातील एक बदल म्हणजे ऋतुराजच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली. संजू सॅमसनने या संधीचे सोने केले. त्याने दीपक हुड्डासोबत दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी रचली. अखेर संजू सॅमसन 77 धावांवर बाद झाला. तर दीपक हुड्डाने शतक ठोकून संघाला 200 पार पोहचवले. (Sanju Samson Deepak Hooda Broke Rohit Sharma KL Rahul Highest partnership for any wicket for India in T20I)

विशेष म्हणजे दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनने केलेली ही 176 धावांची भागीदारी भारताकडून टी 20 क्रिकेटमधील कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. या जोडीने रोहित शर्मा आणि केएल राहुलने 2017 मध्ये श्रीलंकेविरूद्ध पहिल्या विकेटसाठी केलेल्या 165 धावांच्या भागीदारीचे रेकॉर्ड मोडले. याचबरोबर रोहित - शिखरने 2018 मध्ये आयर्लंडविरूद्धची पहिल्या विकेटसाठी 160 धावांनी भागीदारी रचली होती. तर रोहित शर्मा आणि शिखर धवननेच 2017 ला न्यूझीलंड विरूद्ध 158 धावांची भागीदारी रचली होती.

दीपक हुड्डाने टी 20 मध्ये आपले पहिले वहिले शतक झळकावत एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी भारताकडून रोहित शर्माने 4 केएल राहुलने 2 तर सुरेश रैनाने एक शतक ठोकले होते. आता या यादीत चौथा फलंदाज म्हणून दीपक हुड्डाचा समावेश झाला आहे. दुसरीकडे 2015 ला टी 20 पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनने देखील टी 20 मधील आपले पहिले अर्धशतक झळकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT