Sarfaraz khan brother musheer khan hits triple hundred
Sarfaraz khan brother musheer khan hits triple hundred 
क्रीडा

Sarfaraz Khan: छोटे मियाची धडाकेबाज एन्ट्री! त्रिशतक ठोकत सरफराजच्या भावाने निवड समितीची वाढवली डोकेदुखी

Kiran Mahanavar

Sarfaraz Khan Brother Musheer Khan's tripple century : मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सरफराजला संधी मिळेल असे वाटत होते, पण पहिल्या दोन कसोटींसाठी निवडलेल्या संघात त्याला स्थान मिळाले नाही. निवड न झाल्याने सरफराजने दिल्लीत शानदार शतक झळकावले. तो स्वत: मोठी खेळी खेळत आहे, सोबतच त्याचा भाऊही जबरदस्त फलंदाजी करत आहे.

सर्फराजचा धाकटा भाऊ मुशीर खान याने मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सीके नायडू ट्रॉफी सामन्यात अप्रतिम फलंदाजी करत त्याने त्रिशतक झळकावले. मुशीरने मुंबईसाठी पहिल्या डावात 339 धावांची मोठी खेळी केली. मुशीरने 367 चेंडूंच्या खेळीत 34 चौकार आणि 9 षटकार मारले. या 17 वर्षीय फलंदाजाचा स्ट्राइक रेट 92.37 पेक्षा जास्त होता.

मुशीरशिवाय कर्णधार अथर्व विनोदने द्विशतक झळकावले. त्याने 249 चेंडूत 214 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 15 चौकार आणि 11 षटकार निघाले. मुशीर आणि अथर्वच्या खेळीमुळे मुंबईने 138 षटकांत आठ गडी गमावून 704 धावा करून डाव घोषित केला. मुशीर आणि अथर्वशिवाय एकाही फलंदाजाला 50 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. त्याचवेळी हैदराबादने तीन गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा केल्या आहेत.

सरफराजने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यात मुंबईसाठी 125 धावा केल्या होत्या. हे त्याचे प्रथम श्रेणीतील तेरावे शतक होते. सरफराजने रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. त्यानंतर त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली होती.

त्याच वेळी 2019-20 मध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. सर्फराजच्या बॅटमधून दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकली. चालू मोसमात त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. सरफराजची गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही निवड झाली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 10 किलोपर्यंत मोफत रेशन देणार- मल्लिकार्जुन खर्गे

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT