Sourav-Ganguly Sakal File Photo
क्रीडा

टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर गांगुलींची फटकेबाजी

भारतीय संघाची ही सर्वात सुमार कामगिरी असल्याचे परखड मत गांगुली यांनी मांडले आहे.

सुशांत जाधव

संयुक्त अरब अमीरातमध्ये (United Arab Emirates) पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेले. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीवर अनेकांनी टीकाही केली. पण भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात मौन बाळगले होते. हे मौन त्यांनी सोडले आहे.

मागील पाच वर्षांमध्ये भारतीय संघाची ही सर्वात सुमार कामगिरी असल्याचे परखड मत गांगुली यांनी मांडले आहे. प्रसारमाध्यमांसमोर गांगुली म्हणाले की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास 2017 पर्यंत भारतीय संघाची कामगिरी ठिक होती. 2017 मध्ये पाकिस्तान संघाने ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाला पराभूत केले त्यावेळी मी कॉमेंट्री पॅनलमध्ये होतो. त्यानंतर 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाने चांगली कामगिरी केली. पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही टीम इंडियाने निराश केले. मागील 4-5 वर्षांतील संघाची ही निराशजनक कामगिरी आहे, असा उल्लेख गांगुली यांनी केलाय.

संघाची कामगिरी ढासळण्यामागे नेमक कारण काय? याच उत्तर अजूनही मिळालेलं नाही. पण टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळाडू अडखळत खेळताना दिसले. काही वेळा मोठ्या स्पर्धेत या गोष्टीचा सामना करावा लागत असतो. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने 15 टक्के क्षमतेनंच खेळताना दिसला. त्याचा संघाला फटका बसला, असेही गांगुलींनी म्हटले आहे.

आयसीसी पुरुष T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. या दोन पराभवानंतर टीम इंडियाने कमबॅक करुन उर्वरित सर्व सामने मोठ्या तोऱ्यात जिंकले. पण तोपर्यंत टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT