Scott Boland The Mullagh Medal esakal
क्रीडा

रहाणेनंतर बोलँडने कोरले मुलाघ मेडलवर आपले नाव

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने(Australia Cricket Team) इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव करत अ‍ॅशेस मालिका 3 - 0 अशी जिंकली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने (Scott Boland) कमालच केली. पहिल्या डावात फक्त 1 विकेट घेण्यात यश आलेल्या स्कॉट बोलँडने दुसऱ्या डावात फक्त चार षटके टाकत सात धावात सहा फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडला एक डाव आणि 14 धावांच्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्याचा मानकरी म्हणून स्कॉट बोलँडला (Scott Boland) नावाजण्यात आलेच पण, याचबरोबर त्याला प्रतिष्ठेच्या मुलाघ मेडलनेही (The Mullagh Medal) सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे भारताच्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) सर्वात प्रथम मुलाघ मेडलने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मुलाघ मेडल मिळवणारा स्कॉट बोलँड हा दुसरा खेळाडू ठरला. मुलाघ मेडलची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली होती.

बॉक्सिंग डे कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्याला मुलाघ मेडल देण्यात येते. हे मेडल पहिल्यांदा अजिंक्य रहाणेला मिळाले होते. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करताना मेलबर्न कसोटीत 223 चेंडूत 112 धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 12 चौकार मारले होते. तर दुसऱ्या डावात त्याने 40 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 70 धावांचे टार्गेट दिले होते. ते भारताने पार करत सामना जिंकला होता.

काय आहे मुलाघ मेडलचा इतिहास?

या मेडलचे नाव हे 152 वर्षापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला कर्णधार राहिलेल्या जॉनी मुलाघ (Jonny Mullagh) यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. मुलाघ यांनी 1868 मध्ये पहिल्यांदा विदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले होते. ऑस्ट्रेलियाने त्यावेळी इंग्लंडचा दौरा केला होता. मुलाघ यांनी आपल्या कारकिर्दित 45 कसोटी सामने खेळले. त्यातील 71 डावात त्यांनी 1 हजार 698 धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्यांच्या नावावर 257 विकेट्स आहेत. मलाघ यांनी 1866 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर एक बॉक्सिंग डे सामनाही खेळला होता. मुलाघ मेडलवर (The Mullagh Medal) पहिल्यांदा विदेशी दौरा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा फोटो लावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT