Shadab Khan esakal
क्रीडा

Shadab Khan Viral Video : पाकिस्तानात साधा स्ट्रेचर नाही! शादाब राखीव खेळाडूच्या पाठीवर बसून मैदानाबाहेर

अनिरुद्ध संकपाळ

Shadab Khan Viral Video : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दुखापत झालेला शादाब खान राखीव खेळाडूच्या पाठीवर बसून मैदानाबाहेर जातना दिसत आहे. पाकिस्तानातील मैदानात साधा स्ट्रेचरही पुरवण्यात आलेला नाही.

यावरून पाकिस्तानी फॅन्स जाम भडकले. एक चाहता म्हणाला, 'आपण अजूनही 1980 च्या दशकात आहोत का? त्यांनी कशा प्रकारे शादाबला मैदानाबाहेर नेलं? साधा स्ट्रेचरही नाही आहे का?

राष्ट्रीय टी 20 स्पर्धेमधील रावळपिंडी आणि सिआलकोट यांच्यात रविवारी सामना झाला. रावळपिंडीचा कर्णधार शादाब खान याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. शादाब खानने दोन षटकात फक्त 7 धावा दिल्या होत्या. मात्र त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्यानंतर फिजिओने त्याच्या दुखऱ्या घोट्यावर आईस पॅक लावला. सामन्यानंतर शादाबच्या दुखापतीबद्दल माहिती देण्यात आली. त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले.

शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती. शादाब खान हा संघाचा उपकर्णधार होता. मात्र आता पीसीबीने टी 20 क्रिकेटमध्ये शाहीन अफ्रिदीला कर्णधार केलं असून शादाबकडे दुर्लक्ष केलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT