Shahid Afridi Tweeted After Babar Azam Surpasses Inzamam-ul-Haq Captaincy Record In SL vs PAK Test  esakal
क्रीडा

Babar Azam : बाबरने इंझमामचे रेकॉर्ड मोडले; खूष झालेला आफ्रिदी म्हणतो...

अनिरुद्ध संकपाळ

गाले : श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka Vs Pakistan) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिल्या डावात 119 धावांची झुंजार शतकी खेळी केली. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील 7 वे शतक होते. त्याने आपल्या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो जागतिक स्तरावरील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. बाबर आझमचे कौतुक पाकिस्तानचे सर्व खेळाडू करतात त्याने कर्णधार म्हणून एक खास विक्रम केल्यानंतर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ट्विट शेअर करत लिहिले की, 'बाबरने पुन्हा एकदा दबावाच्या क्षणी एक असाधारण खेळी खेळून आपले क्षमता सिद्ध केली आहे. सामन्यात नसीमद्वारा त्याला चांगली साथ मिळाली. शाहीन आणि इतर गोलंदाजांना आता श्रीलंकेला कमी धावात रोखून पाकिस्तानचा विजय निश्चित करावा. एक उत्कृष्ट कसोटी सामना जे पहायलाच हवा.'

बाबर आझमने या शतकाबरोबरच पाकिस्तानकडून कर्णधार (Captain) म्हणून सर्वात कमी डाव खेळत 9 शतके (Century) ठोण्याचा विक्रम केला. त्याने या यादीत इंझमाम - उल - हकला (Inzamam-ul-Haq) देखील मागे टाकले. इंझमामने कर्णधार असताना 131 डावात 9 आंतरराष्ट्रीय शतके केली होती. मिसबाह - उल - हकने 189 डावात 7 तर इमरान खान यांनी 186 डावात 6 शतके केली होती.

याचबरोबर बाबर आझमने आपल्या कारकिर्दितील 10,000 आंतरराष्ट्रीय धावा देखील पूर्ण केले. तो पाकिस्तानचा आणि आशियातील सर्वात वेगाने 10,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेने पहिल्या डावात 222 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 218 धावा केल्या. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत 8 बाद 282 धावा केल्या आहेत. लंकेकडे सध्या 286 धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT