shan-masood Pakistan T20 World Cup sakal
क्रीडा

IND vs PAK: पाकला मोठा धक्का, डोक्याला बॉल लागल्याने स्टार खेळाडू...

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू पोहोचला रुग्णालयात

Kiran Mahanavar

Shan Masood Pakistan T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाला 23 ऑक्टोबरला भारतीय संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच संघाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचला आहे.

पाकिस्तानचा मधल्या फळीतील दशान मसूदला सराव करताना डोक्याला बॉल लागून गंभीर दुखापत झाली आहे. संघाच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या दुखापतीची तपासणी करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी होणाऱ्या सामन्याचा मेलबर्नमध्ये सराव करत असताना मोहम्मद नवाझने फेकलेला चेंडू मसूदच्या डोक्याला लागला.

फलंदाजी करत नसल्याने त्याने हेल्मेट घातले नव्हते. चेंडू लागताच मसूद खाली कोसळल्यामुळे वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती देताना पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. की, 'मसूदची जखम फार गंभीर नाही. चेंडू लागला तेथे सूज आल्याचे दिसत आहे. मेंदूला खोल दुखापत झाली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी त्याला विश्रांती देण्यात येणार आहे.

'मसूदने पाकिस्तानकडून इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पदार्पण केले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात मसूदऐवजी फकर झमानला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT