shikhar dhawan shared team india dressing room celebration video 
क्रीडा

VIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये इशान किशनची धुलाई, शिखरची पोस्ट व्हायरल

वेस्ट इंडिजवर विक्रमी विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष अन्

Kiran Mahanavar

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग 12वा मालिका विजय आहे. अशा स्थितीत विक्रमी विजय मिळवताना संघाचे सेलिब्रेशन कसे मागे राहील. कॅप्टन शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू पूर्ण जोमात डान्स करत आहे.(Shikhar Dhawan Shared Team India Dressing Room Celebration Video)

टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने हा व्हिडीओ शेअर करत मजेशीर कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, टॅलेंट गेम जिंकतो पण टीमवर्क आणि बुद्धिमत्ता चॅम्पियनशिप बनतो. एकामागोमाग एक संघाची अप्रतिम कामगिरी!. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, सेलिब्रेशन मध्ये बाकीचे खेळाडू इशान किशनची धुलाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सामन्यात धवनची बॅट चालली नाही. तो फक्त 13 धावा करून बाद झाला. पण, कर्णधार म्हणून त्याला संस्मरणीय विजय मिळाला. धवनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 97 धावांची इनिंग खेळली होती.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपने कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार निकोलस पूरनने 74 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने 2 चेंडू बाकी असताना 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून अक्षर पटेलने 35 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यरने 63 धावा केल्या. संजू सॅमसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT