esakal
क्रीडा

गब्बर पुन्हा प्रेमात! VIDEO शेअर करत म्हणाला, 'मोहब्बत में बादशाह भी गुलाम...

आयेशासोबतच्या घटस्फोटानंतर टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन पुन्हा पडलाय प्रेमात

धनश्री ओतारी

गेल्यावर्षी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने पत्नी आयेशासोबत घटस्फोट घेतला आहे. नऊ वर्षांच्या संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शिखर धवनने घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तो सध्या कुणाच्या तरी प्रेमात पडला असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर घोडेस्वारीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओत तो घोडेस्वारीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला त्याने हिंदी चित्रपटातील ‘मैं तुझे कबूल’, या गाण्याची जोड दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यानं ‘मोहब्बत में बादशाह भी गुलाम बन जाता है.’अशी खास कॅप्शनदेखील दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहूनर गब्बर पुन्हा प्रेमात पडला अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

नऊ वर्षांचा संसार मोडला

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आयेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त झाली.

धवननं गाजवलय आयपीएलचं मैदान

पंजाब किंग्जकडून खेळताना धवनने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतके झळकावली. तसेच त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ८८ धावा इतकी राहिली आहे. ही त्याची एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची सलग सातवी वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT