Shoaib Akhtar Came In Support Of Virat Kohli Who Brutally Trolled after Poor IPL Season esakal
क्रीडा

'विराटने 45 वर्षापर्यंत खेळावे अन् 110 शतके पूर्ण करावीत'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2022 फारसा चांगला गेलेला नाही. यंदाच्या हंगामात विराटच्या बॅटमधून त्याच्या लौकिकास साजेशा धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर विराटबद्दल अनेक लोकं टीका करत आहे.

दरम्यान, या टीका करणाऱ्यांना फैलावर घेत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) विराट कोहलीच्या समर्थनात पुढे आला आहे.

अख्तरने स्पोट्स कीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'लोकांना वक्तव्य करण्यापूर्वी जरा विचार करण्याची गरज आहे. छोटी मुले त्यांच्याकडे बघत आहेत. विराट कोहलीबाबत त्यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. विराट कोहलीला सन्मान मिळालाच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे.'

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, 'मी पाकिस्तानी होण्याच्या नात्याने सांगतो की विराट कोहली ऑल टाईम ग्रेट खेळाडू आहे. मला वाटते की त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 110 शतके ठोकावीत आणि 45 वर्षापर्यंत क्रिकेट खेळत रहावे.'

अख्तर इथेच थांहला नाही तर तो म्हणाला की, 'विराटवर टीका करणाऱ्यांनी आपल्या शब्द सांभाळून वापरले पाहिजेत. त्यांना सचिन तेंडुलकरकडून शिकले पाहिजे. तो किती नम्र व्यक्ती आहे. तो कोणतेही वक्तव्य देताना विचार करतो. विराटवर टीका करणारे लोक काहीही बोलतात. कधी त्याच्या पत्नीबद्दल तर कधी त्याच्या मुलीबद्दल काहीही बोलतात. हे सर्व ठीक नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

"माझ्या आयुष्यात ती आली" महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने दिली आनंदाची बातमी, PHOTO VIRAL !

Kolhapur Crime: 'महेश राख खूनप्रकरणी चौघांना अटक'; आणखीन काही नावे निष्पन्न, न्यायालयात हजर करणार

Latest Marathi News Updates : ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणामुळे खळबळ; पूजा खेडकरच्या घरी पोलिस दाखल

SCROLL FOR NEXT