Shoaib Akhtar Controversial Statement  esakal
क्रीडा

Shoaib Akhtar : पाकिस्तानी गोलंदाज भारतासारखे नाहीत; शोएब अख्तर पुन्हा बरळला

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Akhtar : टी 20 वर्ल्डकप 2022 ची फायलन इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. पावसाच्या सावटाखाली का असेना नाणेफेक होऊन सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने भारतासारख्या बलाढ्य संघाचा 10 विकेट्सनी मोठा पराभव केला. यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान, याबाबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वक्तव्य करत पुन्हा एकदा भारताला चिमटा काढला.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर शोएब अख्तर भारतावर सातत्याने टीका करत आहे. आता इंग्लंड पाकिस्तान अंतिम सामन्यादरम्यान देखील अख्तरने भारताला टोमणा मारला. आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओत अख्तर म्हणाला की, 'सेमी फायनल आणि फायनल सामन्यात फरक इताकच असणार आहे की इंग्लंडचा आत्मविश्वास हा आभाळात पोहचला असेल. मात्र इंग्लंडला माहिती आहे की पाकिस्तानचे गोलंदाज भारतासारखे नाहीत. त्यांना विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्यांना जाता जाता विजय मिळवता येणार नाहीये.'

अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची किती शक्यता आहे याबाबत बोलताना अख्तर म्हणाला की, 'संघाचा विजय हा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर बराचसा अवलंबून असणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात या दोघांचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा ठरला होता. मेलबर्नवरील विकेट या दोघांना तोच स्ट्राईक रेट कायम राखण्यास मदत करेल.'

पाकिस्तान इंग्लंड फायनल सामन्यात जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या विस्फोटक जोडीकडूनही अपेक्षा असणार आहेत. सेमी फायनलमध्ये बटलरने नाबाद 80 तर हेक्सने नाबाद 86 धावांची दमदार खेळी केली होती. अंतिम सामन्यात देखील ही जोडी अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT