Shoaib Akhtar On Virat Kohli  esakal
क्रीडा

Shoaib Akhtar On Virat Kohli : विराट आमच्या काळात असता तर... शोएब कोहली - तेंडुलकरच्या तुलनेवर स्पष्टच बोलला

शोएबने विराटची स्तुती केली मात्र एका गोष्टीची जाणीव देखील करून दिली.

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Akhtar On Virat Kohli : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नुकतेच विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केलं. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 50 शतकांचा विश्वविक्रम केला आहे. शोएबच्या मते तो मॉर्डन एरा मधील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो शतकांचे शतक नक्की ठोकेल असे शोएबला वाटते

शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय लीग टी 20 च्या दुसऱ्या हंगामासाठी युएईमध्ये दाखल झाला आहे. तो या लीगचा ब्रँड अम्बॅसेडोर आणि समालोचक देखील आहे. यावेळी त्याने एएनआयसी बोलताना विराट कोहलीबद्दल अनेक वक्तव्य केली. शोएब म्हणाला की, जर विराट कोहली एका चेंडूवर वनडे क्रिकेट खेळत असता तर त्याला नक्कीच अडचणींचा सामना करावा लागला असता.

'सचिन तेंडुलकर हा एका चेंडूवरच वनडे क्रिकेट खेळला आहे. त्यावेळी तो चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. सचिनने त्या काळात सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यावेळी फक्त एकच पॉवर प्ले असायचा. आज सचिनने खूप धावा केल्या आसत्या. तो दिग्गज फलंदाज होता. रिकी पाँटिंग, ब्रायन लारा हे देखील दिग्गज होते. वसिम अक्रम आणि शेन वॉर्न दखील दिग्गजच होते.'

शोएब पुढे म्हणाला की, 'विराट कोहली आमच्या काळात नक्कीच स्पर्धात्मकरित्या खेळला असता. मात्र त्याला धावा करताना अडचणींचा सामना करावा लागला असता. आम्हाला मार पडला असता मात्र वसिम अक्रमला खेळणं सोपं नव्हतं. विराट हा विराट आहे. तो या एराचा ग्रेटेस्ट फलंदाज आहे. दोन्ही काळांची तुलना होऊ शकत नाही. मात्र त्याला सलाम माझी इच्छा आहे की त्याने शतकांच शतक ठोकावं.'

विराट कोहलीने 522 आंतरराष्ट्रीय सामन्यात 26,733 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही 54.11 इतकी आहे. त्याच्या नावावर सध्या 80 शतके आणि 139 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 254 धावा इतकी आहे. याचबरोबर तो वनडे क्रिकेट इतिहासात 50 शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

दुसरीकडे सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात 34,357 धावा केल्या. त्याची सरासरी ही 48.52 इतकी असून त्याने 100 शतके आणि 164 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 270 धावा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Car: महाराष्ट्र सदनात नव्या वाहनांची एन्ट्री होणार! मुख्यमंत्र्यांसाठी हायटेक बुलेटप्रूफ कार खरेदी करणार; सरकारचा मोठा निर्णय

Delhi Capitals: ‘हे अपयश जिव्हारी लागतं’; प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर दिल्ली कॅपिटल्समध्ये निराशा, वेणुगोपाल राव भावूक म्हणाले..

E-Scooter : 7 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर; एकदम कमी बजेट अन् 153 कि.मी. जबरदस्त रेंज, पाहा किंमत किती?

Thane Crime: नराधम बापाचा २ लेकींवर अत्याचार, लहान बहिणीवर अत्याचारानंतर मोठ्या मुलीने आईला सांगितल्यानं घटना उघड; डोंबिवलीत खळबळ

Latest Marathi News Live Update: नसरापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मोर्चा

SCROLL FOR NEXT