Shoaib Malik Got Married Sana Javed but where is Sania Mirza marathi news  
क्रीडा

Sania Mirza : ती सध्या काय करते? शोएब मलिक तिसऱ्यांदा बोहल्यावर पण सानिया आहे तरी कुठे? Insta स्टोरी वरून आलं समोर

Shoaib Malik Got Married Sana Javed News |

Kiran Mahanavar

Shoaib Malik Got Married Sana Javed but where is Sania Mirza : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. 41 वर्षीय शोएब मलिकने 30 वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नाची पोस्ट करून पुष्टी केली.

शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीसोबत झाले होते. तर 2010 मध्ये माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत त्याने दूसरे लग्न केले होते. काही महिन्यापुर्वी पाकिस्तानच्या अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की दोघांचा घटस्फोट झाला आहे, परंतु खुद्द सानिया आणि शोएबने कधीही याची पुष्टी केली नाही.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. तिने तिच्या बायोमध्ये पती शोएब मलिकचे नाव देखील जोडले आहे. आधी तिच्या अकाऊंटवर 'सना जावेद' असे लिहिले होते, पण आता तिने तिच्या अकाउंटवर 'सना शोएब मलिक' असे लिहिले आहे. इन्स्टाग्रामवरील तिची शेवटची पोस्ट देखील तिच्या मलिकसोबतच्या लग्नाबद्दल आहे. या सगळ्यादरम्यान सानिया मिर्झा सध्या काय करते असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शोएबने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ पण सानिया मिर्झा आहे कुठे?

सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती घेऊन जवळपास एक वर्ष झाले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये टेनिस कोर्ट सोडणारी सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री करत आहे.

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाआधी सानिया मिर्झाने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सोनी टीव्हीवर कॉमेंट्री करताना दिसत आहे. तिने आपला शेवटचा विम्बल्डन सामना ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णासोबत खेळला होता.

Shoaib Malik Got Married Sana Javed but where is Sania Mirza

शोएब-सानियाची प्रेमकहाणी कधी सुरू झाली?

शोएब आणि सानियाची प्रेमकहाणी रंजक होती. 2009 पासून दोघांमधील जवळीक वाढू लागली. यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न केले. हे लग्न हैदराबादमध्येच झाले. सानिया आणि शोएबला 2018 मध्ये मुलगा झाला. दोघांचे लग्न जवळपास 13 वर्षे टिकले. सानियापूर्वी शोएबने हैदराबादमध्ये आयेशा सिद्दीकीशी लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT