Shreya Shah T20 Cricket Czech Republic esakal
क्रीडा

T20 Cricket : सांगलीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा; झेक रिपब्लिक देशासाठी श्रेयानं केली शानदार कामगिरी

क्रोएशियाबरोबर झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात तिला संघात खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

सांगलीच्या कन्येने परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे.

सांगली : येथील श्रेया शहा (Shreya Shah) सध्या नोकरीनिमित्त झेक रिपब्लिक (यूके प्राग) येथे आहे. झेक रिपब्लिक (Czech Republic) या देशाकडून ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट (T20 Cricket) खेळते. क्रोएशियाबरोबर झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात तिला संघात खेळण्याची संधी मिळाली.

सामन्यात तिने उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणही केले. त्या कामगिरीच्या जोरावर संघाने शानदार विजयही मिळवला. ती पोलाईट स्पोर्टस् क्लबची खेळाडू असून आणखी तीन सामने खेळणार आहे.

माजी रणजीपटू गणेश कुकडे यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज, नीलेश शहा, युसूफ जमादार, राहुल आरवाडे, चिकू कोठारी, अमित फार्णे, चेतन पडियार, विजय वावरे, सागर कोरे, धनंजय डुबल, विजय शिंदे, कपिल गस्ते यांचे मार्गदर्शन मिळाले. सांगलीच्या कन्येने परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT