Smriti Mandhana  Twitter
क्रीडा

स्मृती मानधनाच्या अफेअरची चर्चा, म्युझिक डायरेक्टरला करतीये डेट?

मराठमोळ्या स्मृतीच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगू लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळ्या स्मृतीच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगू लागली आहे.

भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना तिच्या खेळामुळे नेहमी चर्चेत असते. अनेक सामन्यांत दमदार धावांची खेळी करणारी स्मृती मानधना सर्वांच्या पंसतीस उतरली आहे. सध्या एकदीवसीय महिला विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. स्मृतीनेही यात आपले कौशल्य दाखवले आहे. दरम्यान, नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठमोळ्या स्मृतीच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगू लागली आहे. स्मृती मानधना म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

पलाश मुच्छाल याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याच्या हातावर SM18 असं लिहिलेला टॅटू दिसत होता. स्मृतीच्या जर्सीचा नंबर १८ आहे त्यामुळे SM18 चा अर्थ स्मृती मानधना १८ असं होतं असल्याचं म्हटलं गेलं. दरम्यान, यावेळी पलाश मुच्छालच्या या व्हिडीओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी लिहिले, ‘SM18 - म्हणजे स्मृती मानधना १८ आहे का, असंही विचारलं होतं. या कारणामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे.

याशिवाय हे दोघेही अनेकवेळा सोबत दिसले आहेत. जेव्हा पलाश मुच्छालचे नवीन गाणे ‘आखरी बार’ रिलीज झाले, तेव्हा स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे प्रमोशनही केले होते. त्याचवेळी एका शोमध्ये स्मृती मानधनाला पलाश मुच्छालशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. 'पलाश स्मृती मानधनासाठी इतका खास का आहे?'मात्र, स्मृती मानधना या प्रश्नाचे स्पष्टपणे कोणतंही उत्तर देत नाही आणि मला याविषयी काहीही माहिती नाही असे म्हणाली होती. दोघांच्या अफेअरच्या चर्चा असली तरी या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही वक्तव्य केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT