SA vs IND esakal
क्रीडा

SA vs IND : कौशल्य कमी नशीब जास्त... 55 धावात खुर्दा उडाला तरी आफ्रिकेच्या प्रशिक्षकांची कॉलर ताठ

अनिरुद्ध संकपाळ

SA vs IND : भारताने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. केप टाऊन येथील दुसरी कसोटी सात विकेट्स राखून जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला. आफ्रिकेला केप टाऊनमध्ये मात देणारा भारतीय संघ हा आशियामधील पहिला संघ ठरला.

भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 55 धावात खुर्दा उडवला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी खेळपट्टीच्या नावाने गळे काढण्यास सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंग कोचने खेळपट्टी एक चमत्कारच होती असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक शुक्री कोनराड यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

कोनराड म्हणाले की, 'मला माहिती नाही की लोकं मी काय बोलावे अशी अपेक्षा करत आहेत. मात्र तुम्हाला फक्त धावा पाहण्याची गरज आहे. दीड दिवसाची कसोटी! तुम्हाला त्यांनी कशा प्रकारे 80 धावा चेस केल्या हे पहावं लागले. सांगण्यास खेद होत आहे की तुम्हाला या खेळपट्टीवर कौशल्यापेक्षा नशिबाची जास्त गरज होती. कसोटी क्रिकेटची सर्व मूल्य खिडकीतून बाहेर गेली.'

ते पुढे म्हणाले की, 'इथं काय सुरू आहे हे मला माहिती नाही. मी यातून बाहेर पडलो आहे. सर्वांना माहिती आहे की खेळपट्टी चांगली नव्हती.' ग्राऊंड्समन ब्राम माँग यांच्याबद्दल देखील कोनराड यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'मी ब्राम माँग यांना आळोखतो. ती चांगली व्यक्ती आहे. कधी कधी चांगल्या वक्ती देखील वाईठ काम करतात किंवा चुका करतात. मात्र त्यामुळे ते काही वाईट ग्राऊंड्समन होत नाहीत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Starlink Internet Price : स्वस्तात मस्त! भारतात लाँच होतंय Starlink Internet; 25-220 Mbps हाय स्पीड, किंमत फक्त...

Divya Deshmukh : महाराष्ट्राच्या लेकीनं मन जिंकलं! दिव्याच्या हातात 'तो' फोटो; जेतेपद केले समर्पित! कोण आहे ती व्यक्ती?

प्रियाचा खरा चेहरा समोर! सासवांना कळली सायलीची किंमत, प्रियाचे गुन्हे ऐकून सुभेदार कुटुंबीय झालं थक्क,

Latest Maharashtra News Updates : मालेगावात बंदोबस्तात वाढ, बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल थोड्याच वेळात

Oily Skin Care: पावसाळ्यात तेलकट त्वचेवर काय लावावे? चमकदार त्वचा मिळविण्यासाठी 'हे' 5 उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT