South Africa vs India Test Series level Sakal
क्रीडा

RSA vs IND : कॅप्टनचा 'एल्गार'; टीम इंडियाच्या जहाजाशी बरोबरी!

सुशांत जाधव

South Africa vs India, 2nd Test Result : कर्णधार डेन एल्गर (Dean Elgar) च्या जबरदस्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्गचं मैदान फत्तेह केलं. दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. लोकेश राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखालील भारतीय संघाने यजमान आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाशी दक्षिण आफ्रिकेला 122 धावा करायच्या होत्या. तर दुसऱीकडे टीम इंडियाला (Team India) 8 विकेट्स मिळवायच्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ उशीरा सुरु झाला. आणि यात अखेर यजमानांनी बाजी मारली.

दक्षिण आफ्रिकेनं 2 बाद 118 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रस्सी व्हॅन डेर दुसेन (Rassie van der Dussen) 11 (37) आणि कर्णधार डेन एल्गर Dean Elgar 46 (121) धावांवर डाव पुढे सरकवला. कर्णधार डेन एल्गरनं अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या बाजूला दुसेन त्याला उत्तम साथ देत होता. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. शमीनं दुसेनच्या रुपात संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. तो 92 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 40 धावा करुन परतला. दुसऱ्या बाजूला कॅप्टनची चिवट खेळी कायम राहिली.

सेंच्युरियनच्या मैदानात लोकेश राहुलच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली होती. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर आता जोहन्सबर्गच्या वंडर्स मैदानातील विजयासह आफ्रिकेनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिका विजेता पाहण्यासाठी केपटाउनमध्ये 11 ते 15 जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डेन एल्गरनं नाबाद 96 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूनं सलामीला मार्करमनं Aiden Markram उत्तम साथ दिली. या जोडीन पहिल्या विकेटसाठी 47 धावा केल्या. मार्करम बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या पीटरसेननंही कॅप्टनला बऱ्यापैकी साथ दिली. त्याच्यासोबत कॅप्टन एल्गरनं 46 धावांची भागीदारी केली. या छोच्याखानी पण उपयुक्त भागीदारीमुळे भारतीय संघातील गोलंदाजांवरील दबाव वाढत गेला. दुसेन माघारी परतल्यानंतर टेम्बा बवुमानं 45 चेंडूत 23 धावा करत कॅप्टनसोबत दिमाखात पॅव्हेलियनमध्ये परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT