SA vs IND 3rd ODI esakal
क्रीडा

Keshav Maharaj: केशव महाराज येताच वाजलं राम सिया राम! केएल राहुल म्हणतो....

अनिरुद्ध संकपाळ

SA vs IND 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला. भारताने दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिका 2 - 1 अशी जिंकली. सामन्यादरम्यान, भारतीय वंशाचा खेळाडू केशव महाराज फलंदाजीला आला त्यावेळी राम सिया राम हे गाणं मैदानात वाजलं.

आता केशव महाराज ज्यावेळी फलंदाजीला येतो त्यावेळी हे गाणं कायम लावण्यात जातं. हे आता नेहमीचचं झालं आहे. ज्यावेळी केशव महाराज गोलंदाजीला आला होता त्यावेळी देखील हेच गाणं लावण्यात आलं होतं. केशव महाराज हा फलंदाजीला आला अन् केएल राहुलने एक निरीक्षण नोंदवलं.

राहुलने ज्या ज्यावेळी केशव महाराज येतो त्या त्यावेळी राम सिया राम गाणं लावण्यात येतं याकडे महाराजचं लक्ष वेधलं. महाराजने यावर हसून उत्तर दिलं. मैदानावर हे गाणं लावण्यास दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची देखील सहमती असते. दरम्यान, केएल राहुलचे आणि केशव महाराजचे हे संभाषण व्हायरल झाले आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर केशव महाराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली होती. महाराजने तबरेज शम्सीसोभत शेवटच्या विकेटसाठी सामना जिंकवणारी भागीदारी रचली होती. मोहम्मद नवाझच्या गोलंदाजीवर विजयी रन घेतली होती.

यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर 'देवाच्या कृपा हा खास विजय आहे, शम्सी आणि एडिन माक्ररमकडून जबरदस्त कामगिरी जय श्री हनुमान' अशी पोस्ट लिहिली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT