south africa vs zimbabwe sakal
क्रीडा

SA vs ZIM : पावसाने सामना गेला वाहून, झिम्बाब्वेचा पराभव टळला, आफ्रिकेची झाली गोची

पावसामुळे रद्द झाला सामना, दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे प्रत्येकी एक-एक गुण

Kiran Mahanavar

South Africa vs Zimbabwe T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. पावसाने ज्यामध्ये सुरुवातीपासूनच खेळ खराब करण्यास सुरुवात केली. 20-20 षटकांचा हा सामना आधीच 9-9 षटकांचा केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही 9 षटके खेळायची होती, पण दुसऱ्याच षटकात पावसाने पुन्हा खेळ खराब केला.

थोड्याशा रिमझिम पावसातच सामना सुरू झाल्याने दुसऱ्याच षटकात सामना थांबवावा लागला, मात्र काही वेळातच सामना सुरू झाला. 9 ऐवजी 7 षटकांचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेसमोर 7 षटकांत 64 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने सहज पार केले असते कारण 3 षटकांत 51 धावा झाल्या होत्या. परंतु पावसाने पुन्हा खेळ खराब केला आणि सामनाने आफ्रिकेची गोची केली.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 9 षटकात 8 गडी गमावून 79 धावा केल्या. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या षटकात 23 धावा करून चांगली सुरुवात केली, परंतु सामना पूर्ण होऊ शकला नाही. 7 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूत 13 धावा आवश्यक असल्याने दक्षिण आफ्रिकेला निश्चितच गुणांची कमतरता आहे. डी कॉक ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्यावरून निकाल काही चेंडूतच येऊ शकला असता. मात्र तसे झाले नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT