India Women vs South Africa Women
India Women vs South Africa Women Sakal
क्रीडा

Women's World Cup : नो बॉलमुळे मिताली ब्रिगेडचं स्वप्न पुन्हा अधुरं

सकाळ डिजिटल टीम

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील हॅगले ओव्हलच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघानं बाजी मारली. या सामन्यातील पराभवासह भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड पाठोपाठ वेस्ट इंडीजचा संघ सेमी फायनलमध्ये पोहचणारा चौथा संघ ठरला. दिप्ती शर्मानं अखेरच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या 2 चेंडूत 3 धावांची गरज असताना तिने नो बॉल टाकला आणि मॅच आफ्रिकेच्या बाजूनं फिरली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाने आधीच सेमीफायनलचं तिकीट पक्के केले होते. इंग्लंड सेमी फायनलसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला होता. त्यांनी रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले. भारतीय संघाच्या पराभवामुळे वेस्ट इंडीजचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा झाला.

भारतीय महिला संघाने (India Women) पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 274 धावा करुन आफ्रिकेसमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Women ) डावाची सुरुवात खराब झाली. हरमनप्रीत कौरने सलामीची बॅटर Lizelle Lee हिला रन आउट केले. त्यानंतर लॉरा Laura Wolvaardt आणि लारा Lara Goodall या दोघींनी शतकी भागीदारी करुन डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. सामना भारतीय संघाच्या हातून निसटतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना राजेश्वरी गायकावडनं ही जोडी फोडत सामन्यात रंगत आणली. त्यापाठोपाठ लॉराही 80 धावांवर बाद झाली आणि सामना भारतीय संघाच्या बाजूनं झुकला. पण अखेरच्या क्षणी सामना पुन्हा आफ्रिकेच्या बाजूनं झुकला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत मिताली राजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीची बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) 71 (84), शफाली वर्मा (Shafali Verma) 53 (46), कर्णधार मिताली राज (Mithali Raj ) 68 (84) आणि हरमनप्रित कौर हिने 57 चेंडूत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या 7 बाद 274 पर्यंत नेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT