Lakshya Sen Sakal
क्रीडा

Lakshya Sen : भारताच्या लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

पण लक्ष्य याने सर्वस्व पणाला लावत खेळ केला आणि २१-१७, २१-१४ अशा फरकाने ही लढत जिंकली.

सकाळ डिजिटल टीम

Lakshya Sen - भारताचा युवा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने शनिवारी मध्यरात्री झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या केंटा निशिमोटो याच्यावर दमदार विजय कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत मात्र भारताला निराशेला सामोरे जावे लागले. अकाने यामागुची हिच्याकडून पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली.

लक्ष्य सेन याची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १९व्या स्थानावर घसरण झाली आहे. केंटा निशिमोटो जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर आहे. तसेच त्याला या स्पर्धेमध्ये चौथे मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्य - केंटा या लढतीत जपानच्या खेळाडूचे पारडे जड मानले जात होते.

पण लक्ष्य याने सर्वस्व पणाला लावत खेळ केला आणि २१-१७, २१-१४ अशा फरकाने ही लढत जिंकली. लक्ष्य याने ४४ मिनिटांमध्ये विजय साकारला. सुपर ५०० स्पर्धेत त्याने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. गेल्या वर्षभरात त्याला पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठता आली आहे.

आता चीनच्या खेळाडूचे आव्हान

लक्ष्य सेन याच्यासमोर चीनच्या ली शी फेंग याचे आव्हान असणार आहे. ली शी फेंग याला पाचवे मानांकन देण्यात आले आहे. लक्ष्य याने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंत र प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझ्यासाठी सुरुवात निराशाजनक झाली.

माझे शटलकॉकवर नियंत्रण नव्हते. पण काही वेळानंतर नेटजवळील खेळामध्ये मला लय सापडली. स्मॅशही छान लागू लागले. एकूणच काय ही लढत चांगली झाली. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे, असे लक्ष्य पुढे आवर्जून म्हणाला.

जपानच्या खेळाडूकडून पराभव

जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून पी. व्ही. सिंधू हिला पराभव पत्करावा लागला. पहिली मानांकित अकाने हिने सिंधूवर सहज विजय साकारला.

अकाने हिने सिंधूचे आव्हान २१-१४, २१-१५ असे संपुष्टात आणले. चौथी मानांकित सिंधू ४३ मिनिटांमध्ये हरली. अकाने यामागुची - रॅचनोक इंतनॉन यांच्यामध्ये महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला मिळाली गती - मुरलीधर मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT