Anurag Thakur on Ind vs Pak bilateral cricket relations 
क्रीडा

Ind Vs Pak : 'BCCIने खूप आधीच निर्णय घेतलाय...' क्रीडामंत्री अनुराग ठाकूर भारत-पाक सामन्याबद्दल काय म्हणाले?

Kiran Mahanavar

Anurag Thakur on Ind vs Pak bilateral cricket relations : भारतीय क्रिकेट संघ आता कोलंबोमध्ये आशिया कप खेळत आहे. दरम्यान, संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले, ज्यात पहिला सामना पावसामुळे वाहून गेला आणि दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघ आता फक्त आयसीसी आणि आशिया स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन्ही देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

क्रीडामंत्री काय म्हणाले ?

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “खेळाचा संबंध आहे, बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवाद आणि घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही द्विपक्षीय सामने होणार नाहीत. या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची ही भावना आहे असे मला वाटते.

आशिया कप 2023 चे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होते, परंतु बीसीसीआयने भारत सरकारच्या परवानगीअभावी संघ पाकिस्तानला न पाठवण्याचे सांगितले. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची चर्चा केली. अशा परिस्थितीत आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) या स्पर्धेचे संकरित मॉडेल अंतर्गत आयोजन केले, ज्यामुळे काही सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित श्रीलंकेत खेळण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT