Wanindu Hasaranga Pathum Nissanka
Wanindu Hasaranga Pathum Nissanka  ESAKAL
क्रीडा

SL vs PAK : लंकेने कर्णधाराला दिले बर्थडे गिफ्ट! पाकवर पाच विकेट्सनी मिळवला विजय

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan : श्रीलंकेने पाकिस्तानचे 122 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 17 व्या षटकात पार केले. श्रीलंकेने आपला कर्णधार दसुन शानकाला वाढदिवसाचे विजयी गिफ्ट दिले. श्रीलंकेने आशिया कपच्या सुपर 4 मधील आपले सर्व सामने जिंकून 6 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथूम निसंकाने नाबाद 55 धावांची खेळी केली. तर त्याला कर्णधार शानकाने 21 आणि राजपक्षेने 24 धावांची खेळी करत चांगली साथ दिले. पाकिस्तानकडून हारिस रौऊफ आणि मोहम्मद हसनैने प्रत्येकी 2 विकेट घेत लंकेचे टेन्शन वाढवले होते. (Sri Lanka Defeat Pakistan In Asia Cup Super 4 Match Wanindu Hasaranga Pathum Nissanka Shine)

तत्पूर्वी, आशिया कपच्या फायनलची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱ्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 121 धावात रोखले. श्रीलंकेच्या फिरकीपुढे पाकिस्तानच्या भल्या भल्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 4 षटकात 21 धावा देत 3 तर महीश तिक्षाणाने देखील 4 षटकात 21 धावाच देत 2 विकेट घेतल्या. या दोघांनी पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 30 धावा केल्या.

आशिया कप सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला मात दिली. मात्र हे दोन्ही संघ आधीच फायनलमध्ये पोहचले होते. त्यामुळे ही फायनलची रंगीत तालीम होती. रंगीत तालमीत तरी लंकेचा डंका वाजला आहे. मात्र आशियातला टायगर कोण हे ठवणारी लढत रविवारी 11 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT