Sri Lanka  Sakal
क्रीडा

'महाग' झालेल्या श्रीलंकेचे आशियाई कप यजमानपद धोक्यात?

सकाळ डिजिटल टीम

आशियाई कप क्रिकेट स्पर्धेच्या 15 व्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला (Sri Lanka) मिळाले आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या स्पर्धा श्रीलंकेत होणार का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियात नियोजित ICC टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धा ही ऑस्ट्रेलियात होणार असून यापार्श्वभूमीवर आशियाई स्पर्धा देखील टी-20 प्रकारातच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण ही स्पर्धा अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (sri lanka likely lose asia cup 2022 hosting rights due to ongoing economic crisis)

श्रीलंका सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. देशातील या परिस्थितीमुळे त्यांना आशियाई स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची भिती निर्माण झालीये. श्रीलंकेतील विद्यमान राजपक्षा सरकार अर्थिक गर्तेचा सामना करत आहे. गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. यापरिस्थितीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. श्रीलंकेची परिस्थितीत इतकी बिकट आही की, त्याठिकाणी भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 15 व्या हंगामातील सामन्याचे प्रसारणही बंद करण्याची वेळ आलीये.

ICC घेणार अंतिम निर्णय

क्रिकेट पाकिस्तानच्या एका वृत्तानुसार, श्रीलंकेतील परिस्थिती पाहता आगामी आशियाई कप स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येऊ शकते. यासंदर्भात अद्याप आयसीसीने कोणतीही भूमिका मांडलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) तिमाही बैठक दुबईमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या आशियाई स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंकेशिवाय गत विजेता भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान या स्पर्धेत खेळताना दिसतील. 6 वा संघ पात्रता फेरीतून निवडला जाईल. पात्रता फेरीतील लढत 20 ऑगस्टला नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT