Sri Lanka Squad For ICC World Cup 2023 Announced Wanindu Hasaranga Included sakal
क्रीडा

ODI World Cup 2023 : वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच झाली संघाची घोषणा! RCBच्या 'या' खेळाडूची एन्ट्री

Wanindu Hasaranga: एकदिवसीय विश्वचषक २०23 मध्ये खेळणाऱ्या संघासाठी वानिंदू हसरंगाला संधी.

Kiran Mahanavar

Sri Lanka Squad For ICC World Cup 2023 Announced : एकदिवसीय वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला आहे. जवळपास सर्वच संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान, वर्ल्डकप सुरू होण्याच्या दहा दिवस आधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे.

श्रीलंकेचा संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे चिंतेत आहे. त्यामुळेच संघाची घोषणा इतक्या उशिरा झाला. अशा अनेक खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, जे पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत.

दासून शनाकाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, जो आधीच ही जबाबदारी सांभाळत होता. शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ आशिया कप स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र फायनलमध्ये त्यांना टीम इंडियाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

यासोबतच कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दिग्गज खेळाडू वानिंदू हसरंगाची संघात निवड झाली आहे.

वानिंदू हसरंगा, महिषा तिक्शिना, दिलशान मधुष्का यांना संघात घेतले आहे, मात्र ते पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच खेळू शकतील असेही श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 साठी श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका, कुसल मेंडिस, वानिंदू हसरंगा, महेश तिक्षिना, दिलशान मदुशंका, पाथुम निसांका, कुसल झेनिथ, दिमुथ करुणारत्न, चारिथ असलंका, धनंजय, सिल्वामा राजविरा, धनंजय, राजुनाल, मथिशा पाथिराना आणि लाहिरू कुमारा.

राखीव खेळाडू : दुशान हेमंथा आणि चमिका करुणारत्ने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT