Bhuvneshwar Kumar Twitter
क्रीडा

SL vs IND : भुवीनं 6 वर्षानंतर टाकला नो बॉल!

सहा वर्षानंतर आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने नो बॉलच्या रुपात अवांतर धाव दिलीये.

सुशांत जाधव

Sri Lanka vs India, 2nd ODI : भारतीय संघा विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शनाका याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने निर्धारित 50 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 275 धावा केल्या. भारताचा प्रमुख गोलंदाज आणि श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) श्रीलंकेच्या तीन गड्यांना तंबूत धाडले. 10 षटकांच्या आपल्या कोट्यात त्याने 54 धावा खर्च करून या तीन विकेट घेतल्या. यात त्याने एक नो बॉल आणि एक वाईड चेंडू फेकला.

सहा वर्षानंतर आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने नो बॉलच्या रुपात अवांतर धाव दिलीये. 3093 चेंडूनंतर त्याने श्रीलंके विरुद्ध नो बॉल फेकला. यापूर्वी 2015 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भुवीने नॉ बॉल टाकला होता. श्रीलंकेकडून चरिथ असालंका आणि सलामीवीर अविष्का फर्नांडो यांनी अर्धशतके झळकावली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारत 50 षटकात 9 बाद 275 धावा केल्या.

असलंकाने 68 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 65 धावांची केलेली खेळी श्रीलंकन संघाकडून सर्वोच्च ठरली. त्याच्या पाठोपाठ फर्नांडोने 71 चेंडूत 50 धावा केल्या. चमिका करूणारत्ने 33 चेंडूत नाबाद 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे 10 ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघाने 79 धावा कुटल्या. करूणारत्नेनं असलंकाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. भारताकडून फिरकीपटू चहलने 50 धावा खर्च करुन तीन विकेट घेतल्या. भुवीने 54 धावांत तिघांना माघारी धाडले. तर दीपक चाहरने 53 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT