Steve Smith 
क्रीडा

Steve Smith : 9 षटकार 5 चौकार, स्मिथने पुन्हा ठोकले झंझावाती शतक

सामन्यादरम्यान स्मिथने 14 चेंडूत ठोकल्या 74 धावा...

Kiran Mahanavar

Steve Smith Century: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने शनिवारी सिडनी थंडर विरुद्धच्या बिग बॅश लीग 2022-23 सामन्यात धडाकेबाज शतक ठोकले. स्टीव्ह स्मिथचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 56 चेंडूत 101 धावा केल्या होत्या.

बिग बॅश लीगचा 50 वा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात गेला, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथने विरोधी गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले आणि अवघ्या 66 चेंडूत 125 धावा केल्या. या सामन्यात स्मिथचा स्ट्राईक रेट 189.39 होता आणि त्याने बॅटने 9 मोठे षटकार आणि 5 चौकार लगावले. म्हणजेच सामन्यादरम्यान स्मिथने 14 चेंडूत चौकार आणि षटकार लगावत 74 धावा केल्या.

या टूर्नामेंटमध्ये स्मिथने आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 131 च्या सरासरीने आणि 175.83 च्या स्ट्राइक रेटने 261 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे स्मिथ सिडनी सिक्सर्सकडून अवघे तीन सामने खेळून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. स्मिथने 14 चौकार आणि 18 षटकार मारले आहेत.

स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात स्थान मिळत नाही, पण बिग बॅश लीगच्या या मोसमात त्याने आपल्या आक्रमक क्रिकेटचे दर्शन घडवले आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सक्षम आहे हे स्पष्ट आहे. संघासाठी टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी तो प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत त्याला आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्याची संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT