Sunil Gavaskar On Virat Kohli
Sunil Gavaskar On Virat Kohli Sakal
क्रीडा

कोहलीला या गोष्टीची होती भीती; गावसकरांच मोठं वक्तव्य

सुशांत जाधव

विराट कोहली (Virat Kohli) ने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या प्रकरणावर मोठे विधान केले आहे. विराट कोहलीच्या निर्णयामागे नेमंक कारण काय? हे त्यालाच माहिती असेल. पण कदाचित कमी वेळात दुसऱ्यांदा कॅप्टन्सी काढून घेतली जाईल याची भीती त्याच्या मनात असेल, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा, असे गावसकरांनी म्हटले आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli )टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) कोहलीकडून वनडे संघाचे नेतृत्व काढून घेतले. त्याच्या जागी रोहित शर्माला (Rohit Sharma) व्हाइट बॉल क्रिकेट कॅप्टन करण्यात आले. या निर्णयानंतर विराट कोहली भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाच्या रडारवर असल्याचे संकेत मिळाले होते.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर ही मालिका त्यांनी 1-2 अशी गमावली. तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीवेळी गावसकर म्हणाले की, "विराट कोहलीनं घेतलेल्या निर्णयाचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. मॅच प्रेझेंटेशनवेळीच तो अस काही तरी करेल असे वाटत होते. पण कोहलीने जर मॅच संपल्या संपल्या हा निर्णय घेतला असता तर त्याने रागाच्या भरात हा निर्णय घेतल्यासारखे वाटले असते. त्यामुळेच त्याने एक दिवस विचार करुन निर्णय घेतला."

गावसकर पुढे म्हणाले की, "भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना मी जवळून काही गोष्टी अनुभवल्या आहेत. परदेशातील मालिका पराभव क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट बोर्डाला सहन होत नाही. दक्षिण आफ्रिकेतील मालिका गमावल्यामुळे त्याची कॅप्टन्सी धोक्यात आली होती. याआधीही अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा असे झाले असते. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ जिंकू शकत होता. तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाली असती."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT