Sunil Gavaskar prediction T20 World Cup 2022 Finalist esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : गावसकरांची भविष्यवाणी! 'हे' दोन संघ खेळणार टी 20 वर्ल्डकपची फायनल

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar prediction T20 World Cup 2022 : भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप बाबत एक भविष्यवाणी केली आहे. सुनिल गावसकर यांनी यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये कोणत्या दोन संघात फायनल होण्याची शक्यता आहे हे सांगितले. त्यांनी हे वक्तव्य भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यावेळी केले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अंतिम फेरीत पोहचण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांनी देखील कोणते संघ अंतिम सामना खेळतील याचा अंदाज बांधला. मूडी म्हणाले की, 'मी तुम्हाला दोन नाही तर चार नावे देणार आहे. हे संघ सेमी फायनल आणि फायनल खेळू शकतील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ त्यांच्या ग्रुपमध्ये पहिले दोन संघ असतील. माझ्या मते दुसऱ्या ग्रुपमधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सेमी फायनलमध्ये प्रवशे करतील. अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होण्याची शक्यता आहे.

युएईमध्ये गेल्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत वर्ल्डचॅम्पियन बनली होती. यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात अंतिम फेरीत नक्की पोहचेल असा अंदाज वर्तवला जात आहे. सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. भारत आता आपला दुसरा सराव सामना न्यूझीलंडविरूद्ध 19 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा सुपर 12 मधील पहिला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT