Supriya sule praises ruturaj gaikwad shares video of 7 sixes in an over  
क्रीडा

Supriya Sule : पुण्याच्या विश्वविक्रमी ऋतुराजचं सुप्रिया सुळेंनीही केलं कौतुक; ट्विट करून म्हणाल्या…

सकाळ डिजिटल टीम

पुण्याच्या ॠतुराज गायकवाड याने क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सात षटकार ठोकल्याचा पराक्रम केला आणि क्रिडा विश्वातून त्याचे कौतुक केले जात आहे. इतकेच नाही तर राजकीय क्षेत्रातून देखील कौतुकाची थाप मिळत आहे. राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी त्याचा व्हिडिओ ट्विट करत त्याचे कौतुक केलं आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्ध इतिहास रचला. त्याने 159 चेंडूत 220* धावांची नाबाद खेळी खेळली ज्यामध्ये त्याने 10 चौकार आणि 16 षटकार ठोकलेत. एवढेच नाही तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात 7 षटकार मारले आहेत.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

दरम्यान यानंतर सुप्रिया सुळे यांनी या षटकारांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या सोबतच त्यांनी, "अद्भुत! अविस्मरणीय खेळी!! आपल्या ॠतुराज गायकवाड याने हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका ओव्हरमध्ये सलग सात षटकार मारुन विश्वविक्रम केला. यासोबतच त्याने याच खेळीत द्विशतक नोंदविले. त्याचे या खेळीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा." असेही म्हटले आहे.

एक ओव्हर अन् सात सिक्स

विजय हजारे करंडकाच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यातमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने द्विशतकी खेळी साकारली. पण 49 व्या ओव्हरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला.

49 वी ओव्हर घेऊन आलेल्या यूपीचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगला चांगलेच धुतले. त्यानं प्रत्येक चेंडूवर सिक्सरची नोंद केली. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगनं नो टाकला. त्यावरही ऋतुराजनं सिक्सर लगावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह 43 धावा वसूल केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT