suryakumar yadav  sakal
क्रीडा

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियात पोहोचताच सूर्याचे तूफानी तेवर, ठोकले अर्धशतक

सूर्यकुमार यादवचा टी-20 क्रिकेटमध्ये सध्या किती जबरदस्त फॉर्म आहे हे दिसून येत आहे

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष खास राहिले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. यावरून सूर्यकुमार यादवचा टी-20 क्रिकेटमध्ये सध्या किती जबरदस्त फॉर्म आहे हे दिसून येत आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले.

सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकसोबत छोटी पण तुफानी भागीदारी केली. भारताने 20 षटके खेळून 6 गडी गमावून 158 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून भारतासाठी एकमेव अर्धशतक झळकले. सूर्यकुमारने 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 29 धावा केल्या. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला अपयशी ठरले. या सामन्यात आर अश्विन, विराट कोहली आणि केएल राहुल उपलब्ध नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे, कारण यानंतर संघाला टी-20 विश्वचषकाचा सराव सामना खेळायचा आहे.

ऑस्ट्रेलियातील परिस्थितीची सवय करून घेण्यासाठी भारतीय खेळाडू कोणतीही कसर सोडत नाहीत. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. भारतीय संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत जे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळले नाहीत. अशा परिस्थितीत आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिया नियोजित वेळेपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप पाहायचाICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू : मोहम्मद.शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT