Virat Kohli Suryakumar Yadav Instagram Story  esakal
क्रीडा

Virat Kohli Suryakumar Yadav VIDEO : विराटच्या इन्स्टा स्टोरीवर सूर्याची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणतो भाऊ...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Suryakumar Yadav Instagram Story : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात 51 चेंडूत धडाकेबाज 112 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने तिसरा टी 20 सामना 91 धावांनी जिंकला. यानंतर सूर्यकुमार यादववर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. मात्र यात सर्वात लक्षवेधी ठरली ती रन मशीन विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी!

विराट कोहलीने सूर्यकुमारची तिसऱ्या टी 20 सामन्यातील खेळी पाहून इन्स्टाग्रामवर सूर्याचा फोटो लावत त्यावर सूर्या ऑन फायर असे इमोजी लावले होते. ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने सामन्यातील हिरो सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सूर्यकुमार यादव विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम स्टोरीला प्रतिक्रिया देताना दिसतोय.

या स्टोरीला प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार लिहितो की, 'भाऊ.. खूप सारं प्रेम, लवकरच भेटू!'

हॉटेलमध्ये कापला केक

सूर्यकुमार यादवला भेटण्यासाठी स्टेडियमबाहेर चांगलीच गर्दी झाली होती. संघाची बस हॉटेलमध्ये पोहचली त्यावेळी देखील तेथे अनेक चाहते थांबले होते. हॉटेलमध्ये खेळाडूंनी नाचतच सूर्याचे स्वागत केले. यानंतर सूर्याने केक देखील कापला. यानंतर सूर्यकुमार यादव आपल्या रूममध्ये गेला. जाता जाता सूर्या म्हणाला की, तुम्हाला सर्वांना खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार!' (Sports Latest News)

वनडे मालिका 10 जानेवारी पासून सुरू

भारताने टी 20 मालिका 2 - 1 अशी खिशात घातल्यानंतर आता वनडे मालिका 10 जानेवारी पासून सुरू होत आहे. या मालिकेत भारत श्रीलंकेसोबत तीन वनडे सामने खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीसह भारतातील विरष्ठ खेळाडू संघात परतणार आहे.

बांगलादेश दौऱ्यावरील शेवटच्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. सूर्यकुमार देखील आता वनडे संघात असणार आहे. त्यामुळे विराट आणि सूर्या या दोघांनी एकत्र खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT