क्रीडा

Ind Vs Eng Semi Final: कॅटलबोरो नाहीत म्हणजे वर्ल्डकप आपलाच! सोशल मीडियावर चाहत्यांचा कल्ला

सकाळ डिजिटल टीम

T20 विश्वचषक 2022 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे, वर्ल्डकप फायनलसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. या दरम्यान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्ध उपांत्य सेमिफायनल खेळणार आहे. भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी आयसीसीने पंच आणि इतर अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे अंपायर रिचर्ड कॅटलबोरो यांना टीम इंडियाच्या सामन्यात जबाबदारी देण्यात आलेले नाही. या बातमीनंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

आयसीसीने सोमवारी फायनलसाठी सामना अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरे सेमिफायनल 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेडमध्ये होणार आहे, ज्यामध्ये दोन फील्ड अंपायर, थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी यांच्याबाबत आयसीसीने माहिती दिली आहे.

• फील्ड अंपायर: कुमार धर्मसेना आणि आणि पॉल रीफेल

• थर्ड अंपायर: ख्रिस गॅफनी

• फोर्थ अंपायर: रॉड टकर

• मॅच रेफरी: डेव्हिड बून

रिचर्ड कॅटलबोरोंचा नेमका संबंध काय?

सोशल मीडियावर लोक मजेशीर पोस्ट करत आहेत, कारण गेल्या काही आयसीसी इव्हेंटमध्ये जेव्हा-जेव्हा रिचर्ड कॅटलबोरो भारताच्या मॅचमध्ये फील्ड अंपायर बनले आहेत, तेव्हा टीम इंडियाच्या बाबतीत काहीतरी अप्रिय घडले आहे. 2021 चा टी२० विश्वचषक असो किंवा 2019 साली न्यूझीलंडविरुद्ध भारताचा उपांत्य सामना असो ज्या महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला होता आणि भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. 

केवळ हे दोन सामनेच नाही तर अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे रिचर्ड कॅटलबोरो हे भारतासाठी अशुभ ठरले आहेत. यामध्ये 2014 T20 विश्वचषक, 2015 एकदिवसीय विश्वचषक, 2016 T20 विश्वचषक 2016, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचे नॉकआऊट सामने यांचा समावेश समावेश आहे. त्यामुळेच आता भारताच्या सामन्यासाठी रिचर्ड कॅटलबोरो यांची नियुक्ती न झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.

सामन्याच्या वेळा काय आहेत?

• न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30)

• भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडले अॅडलेड (दुपारी 1.30) 

सेमिफायनलमध्ये पोहोचलेले संघ

• ग्रुप-1: न्यूझीलंड, इंग्लंड

• गुप-2: भारत, पाकिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT