MS Dhoni And Harbhajan Singh 
क्रीडा

धोनीचा फोटो क्रॉप केल्याचा आरोप,भज्जीनं टाकला 'दुसरा'

पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखालील पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

सुशांत जाधव

भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या अविस्मरणीय क्षणाला आज 14 वर्षे झाली. 24 सप्टेंबर 2007 मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात टी-20 विश्वचषक उंचावला होता. टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आणि सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने या आठवणीला उजाळा दिला आहे. भज्जीने एक फोटो शेअर करुन वर्ल्ड कप स्पर्धेतील वर्ल्ड कप आठवणी अविस्मरणीय असल्याचे दाखवून दिले आहे.

ज्यावेळी विश्वास हा भितीपेक्षा मजबूत असतो त्यावेळी तुमचे स्वप्न साकार होते, या खास कॅप्शनसह भज्जीने हा फोटो शेअर केला आहेय. पण एका नेटकऱ्याने या फोटोवरुन भज्जीवर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. हरभजन सिंगने ट्विटवर पहिल्यांदा जो फोटो शेअर केला होता त्यामध्ये एका कोपऱ्यावर ट्रॉफीवाली इमोजी पाहायला मिळते.

भज्जीने धोनीचा फोटो चांगला क्रॉप केलाय, अशी प्रतिक्रिया एक नेटकऱ्याने दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भज्जीने त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी दुसरा फोटो शेअर केला. ओरिजनल फोटोमध्ये ट्रॉफीवाल्या इमोजीमागे काय होते हे दाखवून भज्जीने नेटकऱ्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे दाखवून दिले.

पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भज्जीने मोलाचे योगदान दिले होते. त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत करत पहिली-वहिली स्पर्धा जिंकली होती. सामना जिंकल्यानंतर नव्या आणि युवा खेळाडूंच्या हाती ट्रॉफी सोपवून धोनी फ्रेममधून गायब झाल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. कदाचित ही गोष्ट नेटकऱ्याला माहित नसावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

Latest Marathi News Live Update : पुणे पालिकेच्या आरोग्य योजनेचे 'स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार शहरी गरीब योजना' नामकरण

Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य

Kolhapur jotiba : जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; दर्शन मात्र सुरळीत

SCROLL FOR NEXT