T20 World Cup 2022 India face Zimbabwe sakal
क्रीडा

India vs Zimbabwe : भारतासाठी सोपे समीकरण, सामना जिंका अन्...

उपांत्य फेरीत कोण आणि कोणत्या क्रमांकाने जाणार याची उत्सुकता शेवटच्या सामन्यापर्यंत

सुनंदन लेले

T20 World Cup 2022 : रविवारी शेवटचे तीन साखळी सामने होणार असताना भारत वि. झिम्बाब्वे सामन्याकडे सर्वांची नजर राहणार आहे. रोहित शर्माच्या संघासाठी समीकरण एकदम सरळ-साधे आहे. सामना जिंका आणि अव्वल क्रमांकाने ताठ मानेने उपांत्य फेरी गाठा. भारताचा संघ झिबांब्वेपेक्षा खूप मजबूत दिसत असला, तरी स्पर्धेतील उलथापालथ बघता कोणीही दुसऱ्या संघाला कमी लेखणार नाही.

उपांत्य फेरीत कोण आणि कोणत्या क्रमांकाने जाणार याची उत्सुकता शेवटच्या सामन्यापर्यंत ताणली गेली आहे, यातच स्पर्धा रंगल्याची कहाणी लपलेली आहे. भारतीय संघाने अजून भन्नाट खेळ केलेला नाही. तरीही भारतीय संघ अव्वल क्रमांकाने उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अजूनही सलामीच्या जोडीने करिष्मा दाखवलेला नाही. तसेच फिरकी गोलंदाजांनी खरी जादू दाखवलेली नाही आणि तरीही चारपैकी तीन सामन्यांत विजय हाती लागला आहे. म्हणायला गेले तर आता तीन निर्णायक सामने उरले आहेत आणि त्यात चांगला खेळ करायचा आहे, असे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला.

झिबांब्वे सामन्याअगोदर आश्विन बोलायला आला. 'ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आम्ही कधी ऑस्ट्रेलियाल खेळायला आलो नव्हतो. सगळेच वातावरण वेगळे आहे. हवा खूप थंडगार आहे. खेळपट्ट्या ताज्या आहेत, ज्याचा परिणाम खेळावर होतो आहे. खूप सामने अटीतटीचे झाले आहेत. भल्याभल्या संघांना साध्या वाटणाऱ्या संघांनी धक्के दिले आहेत. या सगळ्याचा विचार करून आम्ही शेवटचा साखळी सामना एकदम जोमाने खेळणार आहोत' असे अश्विन म्हणाला, 'ट्वेंटी-२० सामन्यात जो खेळाडू परिस्थिती समजून घेऊन योग्य खेळ करू शकतो तोच पुढे जातो. जास्त योजना आखून चालत नाही, कारण सतत चित्र बदलत असते. अशा वेळी मन शांत ठेवणे गरजेचे असते. भारतीय संघाने आतापर्यंत चांगला प्रयत्न केला आहे. आता निर्णायक सामन्यात सुधारित खेळ करायचा आहे,' असे आत्मविश्वासाने अश्विन म्हणाला.

गेल्या दोन-तीन दिवसांत मेलबर्नची हवा जरा बरी झाली आहे. थंडी खूप कमी झाली आहे आणि आकाशातील ढगांचे राज्यही कमी झाले आहे. त्याचा फायदा घेऊन खेळपट्टी तयार करायला मेहनत घेतली गेली आहे. भरपूर पाणी मारून रोलिंग करून खेळपट्टी फलंदाजीला पोषक करायचा प्रयत्न केला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT