t20 world cup 2022 india matches will be broadcast cinema hallduring inox signed a deal with icc cricket news kgm00 sakal
क्रीडा

खुशखबर! T20 वर्ल्डकप आता थिएटरमध्ये; जाणून घ्या किती शहरात पाहायला मिळेल?

टी-20 विश्वचषकादरम्यान चाहते सिनेमागृहात भारताच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान चाहते सिनेमागृहात भारताच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकणार आहे. INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये टीम इंडियाचे सामने दाखवले जाणार आहे. यासाठी INOX ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (ICC) करार केला आहे. आयनॉक्स लीझर लिमिटेडने मंगळवारी (11 ऑक्टोबर) ही माहिती दिली.

करारानुसार भारतीय संघाचे सर्व गट सामने INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील. टीम इंडिया 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट सामन्यांव्यतिरिक्त उपांत्य फेरी आणि अंतिम सामने देखील INOX वर दाखवले जातील. टीम इंडियाचे सर्व सामने देशभरातील 25 हून अधिक शहरांमधील INOX च्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

INOX चे देशात 165 मल्टिप्लेक्स आहेत. यात 74 शहरांमध्ये 705 स्क्रीनवर चित्रपट दाखवले जातात. भारतभरात त्याच्या जागांची संख्या 1.57 लाख आहे. या वर्षी मार्चमध्ये INOX Leisure आणि PVR यांनी विलीनीकरणाची घोषणा केली होती. ICC पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीनंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 सामने सुरू होतील. अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल , अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (बुमराहच्या जागी अद्याप घोषणा झालेली नाही)

स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT